मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार, 12 रुपये होणार तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:28 AM2017-11-15T03:28:42+5:302017-11-15T08:52:45+5:30

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून मदत मिळण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सुचविलेल्या सुधारणा बेस्ट समितीने अखेर मान्य केल्या आहेत.

Travel to be approved: Best fare hike, best defense action plan, green lantern | मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार, 12 रुपये होणार तिकीट

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार, 12 रुपये होणार तिकीट

Next

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून मदत मिळण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सुचविलेल्या सुधारणा बेस्ट समितीने अखेर मान्य केल्या आहेत. मात्र, बेस्ट बचावसाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार प्रवाशांच्या बसभाड्यात वाढ होणार आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये मंगळवारी हिरवा कंदील मिळाला आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये कोणतीही वाढ नसून, त्यानंतर १ रुपयापासून ते १२ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. त्याचबरोबर, बेस्ट बस पास दरातही वाढ होणार आहे.
कर्जाचे डोंगर वाढतच असल्याने पालक संस्था असलेल्या महापालिकेने जबाबदारी घ्यावी, असे साकडे बेस्ट प्रशासनाने घातले. मात्र, थेट आर्थिक मदत देण्यास नकार देत, बेस्टला यातून बाहेर निघण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. यामधील महत्त्वाच्या बस भाडेवाढीच्या सूचनेस बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे.
कर्मचा-यांवरही संकट-
बेस्टमधील ब श्रेणीतील अधिका-यांचा कार्यभत्ता खंडित करणे, मनुष्यबळाचे नियोजन, शिक्षणासाठी पाल्यांना देण्यात येणारे वित्तीय सहाय्य बंद करणे, शिष्यवृत्ती बंद करणे, गृहकर्जावरील अर्थसहाय्य, व्याजाची योजना बंद करणे.
अ श्रेणी अधिका-यांची संख्या कमी करणे, वाहतूक भत्ता बंद करणे, वाहन कर्ज बंद करणे, नैमित्तिक रजेचे रोखीकरण स्थगित करणे, प्रोत्साहन भत्ते गोठविणे.
अ व ब श्रेणीतील अधिका-यांचा प्रवास भत्ता बंद करणे इत्यादी सुधारणांना बेस्ट समितीत मंजुरी देण्यात आली.
कमी टप्प्यासाठी वाढ नाही
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालणे महत्त्वाचे आहे. प्रवासी भाड्यात वाढ करताना सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेल्या कमी टप्प्याच्या बसमार्गावर कोणतीही वाढ सुचविण्यात आलेली नाही.
- सुरेंद्र बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट

Web Title: Travel to be approved: Best fare hike, best defense action plan, green lantern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.