रविवारी प्रवासखोळंबा निश्चित...; मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 06:58 AM2024-01-26T06:58:13+5:302024-01-26T06:58:21+5:30

ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

Travel ban fixed on Sunday...; Megablocks on Central, Harbor and Western Railway Lines | रविवारी प्रवासखोळंबा निश्चित...; मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी प्रवासखोळंबा निश्चित...; मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : विविध अभियांत्रिकी तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे उपनगरीय वाहतूक सेवेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी, २८ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी १५.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

हार्बर मार्ग
कुठे? : पनवेल ते सीएसएमटी अप आणि सीएसएमटी ते पनवेल बेलापूर डाऊन मार्गावर
किती वाजता? : सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९
परिणाम : पनवेल येथून सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२० वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९:३० वाजता सुटेल आणि १०:५० वाजता पनवेल येथे पोहोचेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३:१६ वाजता सुटेल. सायंकाळी  ४:३६ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

मध्य रेल्वे
कुठे? : माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
किती वाजता? : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:२५ ते दुपारी ३:३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०:५० ते दुपारी ३:४६ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील. माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

Web Title: Travel ban fixed on Sunday...; Megablocks on Central, Harbor and Western Railway Lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.