चुनाभट्टी-कुर्ला स्टेशनदरम्यान रुळाला तडा गेल्यानं हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 07:35 IST2017-10-30T07:35:47+5:302017-10-30T07:35:52+5:30
हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चुनाभट्टी ते कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

चुनाभट्टी-कुर्ला स्टेशनदरम्यान रुळाला तडा गेल्यानं हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
मुंबई - हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चुनाभट्टी ते कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. 40 मिनिटांपासून पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.