एसटीत ‘परिवर्तन’; ताफ्यात येणार नव्या 2,200 बस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 07:59 AM2023-11-21T07:59:27+5:302023-11-21T08:00:01+5:30

सध्या धावतात १४ हजार बस

'transformation' in ST; 2,200 new buses will be added to the fleet | एसटीत ‘परिवर्तन’; ताफ्यात येणार नव्या 2,200 बस

एसटीत ‘परिवर्तन’; ताफ्यात येणार नव्या 2,200 बस

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एक ते दीड हजार बस सेवेतून बाद होणार असल्याने मार्चअखेर ताफ्यात २,२०० नव्याकोऱ्या परिवर्तन बसेस येणार आहेत. या बसगाड्यांची खरेदी करण्यासाठी महामंडळाने निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी वर्ष २०२३-२४च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

यापूर्वी एसटी महामंडळ चासिस म्हणजे सांगाडा खरेदी करून त्यावर आपल्या मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणी करीत असे. मात्र, आता तयार बसची खरेदी केली जाणार आहे. 

एसी इलेक्ट्रिक बस बांधणीची प्रक्रिया पूर्ण
गेल्या वर्षभरात महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या ७००, खासगी ३०० आणि १०० इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत.
एसटीच्या ५,२०० एसी इलेक्ट्रिक बस बांधणीचे
कंत्राट ऑलेक्ट्रॉ कंपनीला देण्यात आले आहे. 
प्रोटोटाइप इलेक्ट्रिक बसची तपासणी चाचणी पूर्ण झाल्यावर या बसेस टप्प्याटप्प्याने जानेवारी २०२४ अखेर ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. या बस नऊ मीटरच्या असतील.

 

 

Web Title: 'transformation' in ST; 2,200 new buses will be added to the fleet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.