Join us

तिघा अप्पर अधीक्षकांच्या बदल्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 21:39 IST

राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे बदल्याचे सत्र कायम राहिले असून तिघा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

मुंबई - राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे बदल्याचे सत्र कायम राहिले असून तिघा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. गृह विभागाने त्याबाबतचे आदेश बजाविले असून संबंधितांना नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याची सूचना केली आहे.भोकर जिल्ह्यातील अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांची औरंगाबाद ग्रामिण येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील उज्ज्वला वनकर यांची राज्य गुप्त वार्ता विभागाच्या औरंगाबादच्या अप्पर अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे तर त्याठिकाणच्या अप्पर अधीक्षक अपर्णा गिते यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या नांदेडच्या अधीक्षक पदाचा पदभार देण्यात आला आहे.

टॅग्स :पोलिसमुंबई