Transfers of police officers under the shadow of CoronaVirus | CoronaVirus कोरोनाच्या सावटाखाली पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

CoronaVirus कोरोनाच्या सावटाखाली पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज आहे. अशावेळीच राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.


मुंबई शहर परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार यांची बदली अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकपदावर करण्यात आली आहे. तर सहायक पोलीस महानिरिक्षक असलेले अभिषेक त्रिमुखे यांची बदली  परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त परमजित दहीया यांची बदली मुंबई शहर परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त या पदावर करण्यात आली आहे. 


आज सायंकाळी या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले असून पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि राज्याचे उपसचिव कैलास गायकवाड यांच्या सह्या आहेत. 
 

Web Title: Transfers of police officers under the shadow of CoronaVirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.