Join us

राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 07:41 IST

IAS Officer Transfer: राज्य सरकारने बुधवारी १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये मुंबई आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

मुंबई - राज्य सरकारने बुधवारी १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये मुंबई आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जीएसटीचे विशेष आयुक्त नितीन पाटील यांची बदली राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी करण्यात आली. पाटील यांच्या जागी दिव्यांग कल्याण सचिव अभय महाजन यांची विशेष आयुक्त (जीएसटी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव हे मुंबई शहराचे नवे जिल्हाधिकारी असतील. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर हे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी असतील. 

 

टॅग्स :महाराष्ट्र सरकार