Mumbai: मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध राणीची बाग सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुललेली असतानाच, तिथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राणी संग्रहालयातील उपहारगृह परिसरात असलेल्या एका टेबलचा कोपरा लागल्याने एका ६ वर्षीय बालकाला आपला डोळा गमवावा लागला आहे. या घटनेमुळे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
ही दुर्दैवी घटना २८ डिसेंबर रोजी घडली. एक लहान मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत राणी बागेत फिरण्यासाठी आला होता. कँटीन परिसरात चालत असताना, मुलाच्या डोक्याच्या उंचीवर असलेल्या टेबलचा एक अणकुचीदार कोपरा थेट त्याच्या डोळ्याला लागला. व्हायरल व्हिडीओनुसार, दुखापत होताच मुलगा वेदनेने विव्हळत आईला बिलगला. पालकांनी तातडीने तपासणी केली असता मुलाच्या डोळ्याला दुखापत अतिशय गंभीर असल्याचे समोर आले.
१० दिवसांत दुसरी दुर्घटना
राणी बागेतील निष्काळजीपणा इथेच थांबलेला नाही. अवघ्या १० दिवसांपूर्वी दुसरी एक घटना घडली, जिथे घसरगुंडीवर खेळत असताना एका मुलाला तिथे असलेल्या पत्र्याचा कोपरा लागला. या घटनेत मुलाच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याला दोन टाके घालावे लागले आहेत.
माजी महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक
या घटनांची माहिती मिळताच माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणी बागेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत उद्यानात फिरणाऱ्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? अशी विचारणा केली. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
Web Summary : A six-year-old lost an eye after an accident at Mumbai's Byculla Zoo. A sharp table corner caused the injury. This incident follows another where a child was injured on a slide. Former Mayor Kishori Pednekar demands improved safety measures.
Web Summary : मुंबई के भायखला चिड़ियाघर में एक दुर्घटना में छह साल के बच्चे ने आंख खो दी। एक नुकीले टेबल के कोने से चोट लगी। इससे पहले एक और घटना हुई थी जिसमें एक बच्चा स्लाइड पर घायल हो गया था। पूर्व महापौर किशोरी पेडनेकर ने सुरक्षा उपायों में सुधार की मांग की।