साडेतीन कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 05:45 AM2019-11-13T05:45:49+5:302019-11-13T05:46:45+5:30

सहार विमानतळावर साडेतीन कोटी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने उघडकीस आणली.

Trafficking of three and a half crore blood vessels exposed | साडेतीन कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी उघड

साडेतीन कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी उघड

Next

मुंबई : सहार विमानतळावर साडेतीन कोटी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने उघडकीस आणली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अटक आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (क्राइम ब्रांच) कक्ष ९ चे प्रमुख महेश देसाई यांच्या पथकाने सप्टेंबर महिन्यात आठ कोटींच्या रक्तचंदनाच्या तस्करी प्रकरणी १३ जणांना अटक केली होती. त्यातील एक संशयित आरोपी शहजाद सय्यद याच्याकडे कक्ष ९ चे पोलीस निरीक्षक संजीव गावडे चौकशी करीत होते. चौकशीत त्यांना समजले की, चीन आणि दुबईला बेकायदेशीररीत्या पाठवल्या जाणाऱ्या रक्तचंदनाचा मोठा साठा सहार विमानतळावरील कार्गोच्या कार्यालयात लपविण्यात आला आहे.
त्यानुसार रविवारी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गावडे व पथकाने कार्गोवर छापा टाकला. या छाप्यात ६०० किलोग्रॅमचे ९२ रक्तचंदानाचे तुकडे त्यांना सापडले. याची किंमत साडेतीन कोटी रुपये असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कमलेश नामक इसमाचे ते कंसायमेन्ट असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून या प्रकरणी त्याचा साथीदार तफसीर जाहीर अन्सारी (२९) याला अटक करण्यात आली.
या गुन्ह्यात काही सरकारी अधिकाºयांचीही मिलीभगत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत असून अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
>तपासात असहकार्य
पोलिसांनी अटक केलेला अन्सारी हा तपासात योग्य ते सहकार्य करीत नाही. मात्र प्राथमिक पोलीस चौकशीत रक्तचंदन चेन्नईवरून आणण्यात आले असून दुबई आणि हाँगकाँगला पाठविण्यात येणार होते, अशी माहिती हाती आली आहे.

Web Title: Trafficking of three and a half crore blood vessels exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.