traffic problem due to bridge accident at Kings Circle | किंग्ज सर्कल येथील पूल दुर्घटनेमुळे कोंडी

किंग्ज सर्कल येथील पूल दुर्घटनेमुळे कोंडी

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली शुक्रवारी झालेल्या अपघातामुळे चाकरमान्यांना मोठ्या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला.

शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास एमएच १९ जीयू १०२१ या ट्रकने किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली असणाऱ्या हाइट बॅरियरला धडक दिली. यामुळे बॅरियरचा लोखंडी भाग व पादचारी पुलाचा काही भाग रस्त्यावर कोसळला. यात जीवितहानी झाली नाही. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यातच शुक्रवारच्या अपघातामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली. सायन ते दादर हे अंतर कापण्यासाठी एक ते दीड तास लागत होता.

संध्याकाळनंतर वाहतूक पूर्ववत
सायन उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने गुरुवारपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी किंग्ज सर्कल येथील घटनेमुळे त्या वाहतूककोंडीत अधिकच भर पडली. यामुळे वाहतूक पोलिसांच्या अडचणीतही भर पडली. दुपारी क्रेनच्या साहाय्याने पुलाचा अपघातग्रस्त भाग बाजूला करण्यात आला. संध्याकाळनंतर नागरिकांना वाहतूककोंडीपासून काहीसा दिलासा मिळाला.

Web Title: traffic problem due to bridge accident at Kings Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.