Traffic conditions caused by monorail traffic jam due to technical breakdown | तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल
तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलला होणारा विद्युत पुरवठा बंद झाल्याने सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत मोनोरेल ठप्प झाली.

चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियम दरम्यान मोनोरेल बंद पडली. वाशी नाका परिसरात मोनोरेल मध्येच बंद झाल्याने मोनोरेलमधील सर्व प्रवासी अडकले होते. मात्र मोनोरेल बंद पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. जवानांनी मोनोरेलच्या डब्यांना शिडी लावून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

ऐन गर्दीच्या वेळेत मोनोरेलची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले. आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना प्रवासासाठी विविध पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. 


Web Title: Traffic conditions caused by monorail traffic jam due to technical breakdown
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.