Torres Scam: युक्रेनियन महिलेने हजारो भारतीयांना फसवले, पैशाच्या लोभात शेकडो लोक अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 17:10 IST2025-01-12T17:09:26+5:302025-01-12T17:10:44+5:30

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, मुंबईसह उपनगरातील ६ ठिकाणी टोरेस आउटलेट उघडण्यात आले. यामधून दागिने विकले जात होते. यामधून बोनस योजना सुरू केली होती.

Torres Scam Ukrainian woman cheats thousands of Indians, hundreds trapped in greed for money | Torres Scam: युक्रेनियन महिलेने हजारो भारतीयांना फसवले, पैशाच्या लोभात शेकडो लोक अडकले

Torres Scam: युक्रेनियन महिलेने हजारो भारतीयांना फसवले, पैशाच्या लोभात शेकडो लोक अडकले

Torres Scam ( Marathi News ) : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सरू केली आहे. 

टोरेस घोटाळ्याचा मास्टरमाइंड उघड झाला आहे. मुंबईत एका युक्रेनियन महिलेसह दोघांनी मिळून शेकडो लोकांची फसवणूक केली. टोरेस ज्वेलरी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आर्टेम आणि ओलेना स्टोइन या युक्रेनियन नागरिकांचा शोध सुरू केला आहे. हे दोन आरोपी या घोटाळ्याचे मास्टरमाइंड आहेत.

सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्यांनी लोकांना आकर्षित केले. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी, गुन्हेगारांनी लकी ड्रॉ बक्षिसे देऊन १४ लोकांना आलिशान गाड्याही दिल्या. गेल्या आठवड्यात टोरेस ज्वेलरी चेनने सहा दुकाने बंद केली तेव्हा अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

खरं तर, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, मॅक्सिमम सिटी आणि आसपासच्या ६ ठिकाणी टोरेस आउटलेट उघडण्यात आले होते. या दुकानांमध्ये रत्ने आणि दागिने विकले जात होते. ही दुकाने बोनस योजना देत होते. १ लाख रुपये गुंतवणाऱ्या ग्राहकाला १०,००० रुपये किमतीचा मॉइसनाइट स्टोन पेंडंट देत होते. तसेच ग्राहकांना ५२ आठवड्यात ६ टक्के व्याज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. नंतर हे व्याज ११ टक्के करण्यात आले.

सुरुवातीला व्याज मिळत होते पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना कोणतेही व्याज मिळालेले नाही. त्यांना मोइसानाइट असल्याचा दावा करणारे पेंडेंट देखील बनावट आहेत. ६ जानेवारी रोजी जेव्हा टोरेसची सर्व दुकाने बंद झाली तेव्हा गुंतवणूकदारांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

बहुतेक गुंतवणूकदार हे मध्यम वर्गातील आहेत. यामध्ये भाजीपाला विक्रेते आणि लहान व्यापाऱ्यांचा समावेश आहे. लोकांनी १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली.

कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रारीनंतर, पोलिसांनी प्लॅटिनम हॉर्न प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग फर्म, तिचे दोन संचालक, सीईओ, जनरल मॅनेजर आणि एका स्टोअर इन्चार्जविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचणे यासह इतर आरोप लावण्यात आले आहेत.

Web Title: Torres Scam Ukrainian woman cheats thousands of Indians, hundreds trapped in greed for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.