मुंबईवर 'टोलधाड'! पाचही नाक्यांवर उद्यापासून दरात वाढ; पहा किती महाग पडणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 23:12 IST2023-09-30T23:12:35+5:302023-09-30T23:12:54+5:30
वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसरमधील टोलनाक्यांवरील दरात मोठा वाढ करण्यात आली आहे.

मुंबईवर 'टोलधाड'! पाचही नाक्यांवर उद्यापासून दरात वाढ; पहा किती महाग पडणार...
मुंबईमध्ये येणे - जाणे आता महागणार आहे. मुंबईच्या वेशीवरील पाचही टोल नाक्यांच्या दरात उद्यापासून म्हणजेच मध्यरात्री १२ वाजल्यारपासून मोठा वाढ केली जाणार आहे. यामुळे वाहनचालकांना 12.50 ते 18.75 टक्के अधिकचा भुर्दंड बसणार आहे.
वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसरमधील टोलनाक्यांवरील दरात मोठा वाढ करण्यात आली आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून ही वाढ करण्यात आली आहे.
चारचाकी वाहनांना असलेला ४० रुपयांचा टोल आता ५ रुपयांनी वाढून ४५ रुपये आकारला जाणार आहे. मिनी बस, छोटे टेम्पोंसाठी असलेला 65 रुपये टोल १० रुपयांनी वाढून 75 रुपये आकारला जाणार आहे.
मोठ्या ट्रकसाठी आकारला जाणारा टोल १३० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आला आहे. तर ट्रेलरसारख्या अवजड वाहनांसाठी सध्याचा १६० रुपयांचा टोल ३० रुपयांनी वाढवून १९० रुपये करण्यात आला आहे.