Join us

लोकल प्रवासाची आज परीक्षा, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गर्दीचे चित्र स्पष्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 08:20 IST

Mumbai Local : मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन म्हणाले की, रविवारी आणि सोमवारी सुट्टी होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी होती. त्यात कामगारवर्ग आहे तो १८ ते ४४ या वयोगटातील आहे.

मुंबई : लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांसाठी रविवारपासून लोकल प्रवासाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेकजण लस घेण्यासाठी घाई करू लागले आहेत. परंतु, रविवारी आणि सोमवारी सुट्टी असल्याने लोकलमध्ये फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही. मंगळवारी गर्दीत वाढ होण्याची शक्यता असून, प्रशासनाची खरी परीक्षा असणार आहे.मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन म्हणाले की, रविवारी आणि सोमवारी सुट्टी होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी होती. त्यात कामगारवर्ग आहे तो १८ ते ४४ या वयोगटातील आहे. ४५ ते ६० वयोगटातील प्रवाशांचे प्रमाण कमी आहे. 

टॅग्स :मुंबई लोकलमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस