म्हाडाच्या फॉर्मसाठी आज शेवटचा दिवस; आतापर्यंत सव्वालाख लोकांनी भरले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:44 AM2023-07-10T05:44:36+5:302023-07-10T05:45:04+5:30

१० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील तर रात्री ११:५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील.

Today is the last day for MHADA form; So far, 100,000 people have filled the application form | म्हाडाच्या फॉर्मसाठी आज शेवटचा दिवस; आतापर्यंत सव्वालाख लोकांनी भरले अर्ज

म्हाडाच्या फॉर्मसाठी आज शेवटचा दिवस; आतापर्यंत सव्वालाख लोकांनी भरले अर्ज

googlenewsNext

मुंबई - म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) जाहीर झालेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीसाठी असलेल्या संगणकीय सोडत प्रक्रियेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अर्ज करण्याची मुदत १० जुलै आहे. आतापर्यंत सव्वालाख लोकांनी अर्ज भरला असून त्यापैकी ९८ हजार लोकांनी अनामत रक्कम भरली आहे. 

१० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील तर रात्री ११:५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असेही म्हाडाच्या मुंबई मंडळाने म्हटले आहे.

Web Title: Today is the last day for MHADA form; So far, 100,000 people have filled the application form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा