टाटा समाज विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्याला ६६ लाखांचे पॅकेज; ६५ पैकी ५८ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 06:41 IST2026-04-02T06:40:56+5:302026-04-02T06:41:18+5:30

८९ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या

TISS Student Secures Record 66 Lakh Package in Campus Placements | टाटा समाज विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्याला ६६ लाखांचे पॅकेज; ६५ पैकी ५८ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर्स

टाटा समाज विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्याला ६६ लाखांचे पॅकेज; ६५ पैकी ५८ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर्स

मुंबई : टाटा समाज विज्ञान संस्थेतील एका विद्यार्थ्याला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ६६ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. हा विद्यार्थी 'ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट अँड लेबर रिलेशन' या विषयात एम. ए. करीत आहे. तर हा अभ्यासक्रम शिकणाऱ्या ८९ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीत कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या आहेत.

'टीआयएसएस'मधील अभ्यासक्रमाच्या ६५ विद्यार्थ्यांपैकी ५८ विद्यार्थ्यांना ३४ कंपन्यांनी नोकरीच्या ऑफर्स दिल्या आहेत. त्यातील ११ कंपन्या या 'टीआयएसएस'च्या कॅम्पस या प्लेसमेंटमध्ये पहिल्यांदाच सहभागी झाल्या आहेत. गेल्यावर्षी 'टीआयएसएस'मधील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला सर्वाधिक ३६.२५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते. त्यात भरघोस वाढ होऊन यंदा ते ६६ लाख रुपयांपर्यंत पोहोचले, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

सर्वाधिक पॅकेजची ऑफर मिळालेल्या पहिल्या १० टक्के विद्यार्थ्यांना सरासरी ४९.७५ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. तर सर्वाधिक पॅकेजची ऑफर मिळालेल्या पहिल्या २५ टक्के विद्यार्थ्यांना सरासरी ४०.८४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना मिळून सरासरी २८ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.

बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स क्षेत्रात प्राधान्य 

यंदा नोकऱ्या देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण बैंकिंग, फायनान्स, इन्शुरन्स या क्षेत्रातील कंपन्यांचे आहे. त्यांनी २० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स दिल्या आहेत. त्याखालोखाल कन्सल्टिंग क्षेत्रातील कंपन्यांनी १७ टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत.

या आहेत नोकऱ्या 

ऑफर करणाऱ्या कंपन्या ब्लॅकरॉक, बार्कलेज, डिलॉईट, अक्सेंचर, बीपीसीएल, सॅमसंग, मोतीलाल ओसवाल, रिलायन्स, टाटा अॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, नेस्ले आदी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

Web Title : TISS के छात्र को मिला ₹66 लाख का पैकेज; 89% को नौकरी

Web Summary : TISS के एक छात्र को कैंपस प्लेसमेंट में ₹66 लाख का पैकेज मिला। मानव संसाधन प्रबंधन के 89% छात्रों को 34 कंपनियों से नौकरी के प्रस्ताव मिले, जिनमें पहली बार भाग लेने वाली कंपनियाँ भी शामिल हैं। शीर्ष प्रदर्शन करने वालों को औसतन ₹49.75 लाख मिले। बैंकिंग और वित्त क्षेत्र में सबसे अधिक भर्तियाँ हुई।

Web Title : TISS Student Lands ₹66 Lakh Package; 89% Secures Job Offers

Web Summary : A TISS student secured a ₹66 lakh package in campus placement. 89% of Human Resources Management students received job offers from 34 companies, including first-time participants. Top performers averaged ₹49.75 lakhs. Banking and finance sectors led hiring.