गुरुवार ठरला ढगांचा वार! आज पावसाची शक्यता!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 06:43 IST2018-03-16T06:43:21+5:302018-03-16T06:43:21+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर वातावरण ढगाळ होते.

गुरुवार ठरला ढगांचा वार! आज पावसाची शक्यता!!
मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर वातावरण ढगाळ होते. पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबई, कोकणासह सर्वत्र ढगांची दाटी झाली होती. कधीही पाऊस पडेल असे वातावरण होते. पुणे, पनवेल आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या.