The three-year-old Chimurda remained safe even after being crushed by the car, the driver arrested in Malvani | कारने चिरडल्यानंतरही तीन वर्षांचा चिमुरडा राहिला सुरक्षित, मालवणीमध्ये चालकाला अटक

कारने चिरडल्यानंतरही तीन वर्षांचा चिमुरडा राहिला सुरक्षित, मालवणीमध्ये चालकाला अटक

मुंबई : घराबाहेर खेळणाऱ्या अमर मनिहार (३) याला एका कारने चिरडले. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला जो काळीज पिळवटून टाकणारा होता. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय या घटनेत आला असून त्याचा जीव वाचला असल्याची माहिती आहे. मात्र मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चालकाला अटक केली आहे.
मालवणी परिसरात राहणारा मनिहार हा शुक्रवारी घराबाहेर खेळत होता. त्याच दरम्यान एका कारने त्याला धडक दिली आणि चक्क ती त्याच्या अंगावरून गेली. ज्यात त्याला हाताला आणि चेहºयाला दुखापत झाली. चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने गाडी थांबवत मनिहारच्या कुटुंबीयांना त्याला रुग्णालयात दाखल करण्याची तयारी दाखवली.
त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला जखमी अवस्थेत जवळपास तीन खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या सीटी स्कॅन अहवालात कोरोना संशयित असा उल्लेख असल्याने त्याला अंधेरी ते कांदिवली
परिसरात एकाही रुग्णालयाने
दाखल करून घेण्याची तयारी दाखवली नाही.
अखेर विलेपार्लेच्या खासगी रुग्णालयात त्याला दाखल करत त्याच्यावर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी मनिहारला चिरडणाºया चालकाला अटक केली आहे. जो मालवणी परिसरातीलच रहिवासी आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The three-year-old Chimurda remained safe even after being crushed by the car, the driver arrested in Malvani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.