शासकीय कर्मचाऱ्यांना आता तीन वेळा कालबद्ध पदोन्नती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:01 IST2019-03-03T03:01:17+5:302019-03-03T03:01:23+5:30
राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात बढतीची वेतनश्रेणी (कालबद्ध पदोन्नती) आता दोनऐवजी तीनवेळा मिळणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना आता तीन वेळा कालबद्ध पदोन्नती
मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात बढतीची वेतनश्रेणी (कालबद्ध पदोन्नती) आता दोनऐवजी तीनवेळा मिळणार आहे. सहाव्या वेतन आयोगात ती दोनवेळा देण्यात येत होती. राज्य सरकारने सातवा वेतन आयोग जाहीर करताना तीन कालबद्ध पदोन्नतीचा निर्णय घेतला होता. त्याचा आदेश शनिवारी काढण्यात आला.
या आदेशानुसार पहिल्या कालबद्ध पदोन्नतीच्या आठ वर्षांनंतर दुसरी कालबद्ध पदोन्नती मिळेल आणि दुसºया कालबद्ध पदोन्नतीच्या १० वर्षांनंतर तिसरी कालबद्ध पदोन्नती दिली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांना आधीच दोन कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्या आहेत, त्यांना दुसºया कालबद्ध पदोन्नतीच्या सहा वर्षांनंतर कालबद्ध पदोन्नती दिली जाईल.