Join us  

तीन वरिष्ठ अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र, महासंचालकांची जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 6:09 AM

महासंचालक (डीजी) दर्जाच्या पदोन्नतीसाठी अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक ६ मार्चला झाली. त्यात आयपीएसच्या १९८८च्या तुकडीतील रश्मी शुक्ला, रजनीश सेठ व व्यंकटेशम यांची नावे समितीपुढे ठेवली.

- जमीर काझीमुंबई  - राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह तिघे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी महासंचालक पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरले. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांच्या बढतीला हिरवा कंदील दाखविला. राज्याचे अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ व पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम हे अन्य दोघे अधिकारी आहेत.महासंचालक (डीजी) दर्जाच्या पदोन्नतीसाठी अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक ६ मार्चला झाली. त्यात आयपीएसच्या १९८८च्या तुकडीतील रश्मी शुक्ला, रजनीश सेठ व व्यंकटेशम यांची नावे समितीपुढे ठेवली. त्यांचे गोपनीय अहवाल सर्वोत्कृष्ठ असल्याने, तसेच त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू नसल्याने त्यांना बढतीसाठी पात्र ठरविले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेही १९८८च्या आयपीएस तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांना गेल्या वर्षी डीजीची पदोन्नती मिळून त्यांच्याकडे एसीबीची धुरा सोपविली होती. राज्यात महासंचालक दर्जाची आठ पदे मंजूर असून त्यापैकी ‘एसीबी’चे पद १६ दिवसांपासून रिक्त आहे. येथे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे आयुक्त वगळता संजय पाण्डेय (होमगार्ड), बिपिन बिहारी (पोलीस गृहनिर्माण), एस. एन. पाण्डेय (सुधारसेवा), डी. कनकरत्नम (सुरक्षा महामंडळ) व हेमंत नागराळे (एल अ‍ॅण्ड टी) यापैकी एकाची नियुक्ती होईल. त्या जागेवर पदोन्नतीसाठी पात्र अधिकाऱ्यांपैकी शुक्ला यांना बढती दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.नियुक्तीच्या निकषाकडे लक्षमहाविकास आघाडी सरकार एसीबीच्या प्रमुखपदाची निवड करताना सेवा ज्येष्ठतेचा निकष कायम ठेवते की सोयीनुसार अधिकाºयाची नियुक्ती करते, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्रमुंबई