गोरेगावमध्ये दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू, आठ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 07:08 AM2018-12-24T07:08:34+5:302018-12-24T07:08:43+5:30

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलालनगरमध्ये बांधकाम सुरू असलेले दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे.

 Three people were killed and eight injured in Goregaon accident | गोरेगावमध्ये दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू, आठ जखमी

गोरेगावमध्ये दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू, आठ जखमी

Next

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलालनगरमध्ये बांधकाम सुरू असलेले दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. म्हाडा वसाहतीत घडलेल्या या दुर्घटनेत आठ जण जखमी झाल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा वसाहतीत सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथे बांधकाम सुरू असलेली दुमजली चाळ कोसळून तीन ठार, तर आठ जण जखमी झाले.
जखमींना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये मनोज राजवंशी, शेखर वडार, मुन्ना शेख, शिनू वडार, हरी वडार, शंकर पटेल, सरोजी वडार, रमेश मिषाद यांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.
दुमजली चाळीचे अनधिकृत बांधकाम सुरू होते. दुर्घटनेवेळी कुटुंबीयांसह कामगारही घरातच होते. मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी धाव घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले.
बचावकार्यादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. त्यानंतर, मदतीस आलेल्या बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढले. रमनकुमार गोरे मंदार (३०), राजेंद्र मिषाद (४०), सुभाष मुंशी चौहान (३८) या तीन पुरुषांचा मृतांत समावेश आहे.

म्हणून झाला अपघात?

मोतीलाल नगरमधील ६८ क्रमांकाच्या चाळीत ५३६ क्रमांकाच्या घराच्या बांधकामात लोखंडी चॅनेल, कडप्पा आणि सिमेंट क्राँकीटच्या लोड बेरिंगच्या बांधकामाचे वजन ठेवले. मात्र हे वजन आधीच्या लोखंडी चॅनेलला पेलता न आल्याने सगळा डोलारा कोसळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Web Title:  Three people were killed and eight injured in Goregaon accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई