तरुणाच्या अवयवदानातून मिळाले तिघांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:45 IST2025-01-24T10:44:34+5:302025-01-24T10:45:11+5:30

Mumbai News: नवी मुंबईत राहणाऱ्या स्वप्निल राठोड (३४)  यांना चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते मेंदूमृत झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान केल्यामुळे तीन  जणांना जीवनदान मिळाले.  

Three people were given life through organ donation from a young man | तरुणाच्या अवयवदानातून मिळाले तिघांना जीवदान

तरुणाच्या अवयवदानातून मिळाले तिघांना जीवदान

 मुंबई  - नवी मुंबईत राहणाऱ्या स्वप्निल राठोड (३४)  यांना चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते मेंदूमृत झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान केल्यामुळे तीन  जणांना जीवनदान मिळाले.  

स्वप्निल यांना रविवारी घरी असताना चक्कर आली. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मोठ्या रुग्णालयात हलविण्याचे सांगितले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या अवयवदानातून दोन किडन्या आणि यकृत दान करण्यात आले.  

प्रेमळ आणि मदतीला धावणारा
स्वप्निल यांच्या अवयवदानाबद्दल त्यांचे मित्र सुभाष तिवारी म्हणाले, अवयवदान करायचे का, असे डॉक्टरांनी विचारल्यावर स्वप्निलचे बाबा रूपचंद राठोड आणि पत्नी अश्विनी राठोड यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यास संमती दिली. स्वप्निल प्रेमळ स्वभावाचा होता. सगळ्यांसाठी धावून जाणारा मरणोत्तरही इतरांना जीवदान देऊ गेला आहे. 

Web Title: Three people were given life through organ donation from a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.