गर्दीमुळे लोकलमधून तीन प्रवासी पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 08:10 IST2026-01-31T08:08:58+5:302026-01-31T08:10:35+5:30
Mumbai Suburban Railway: मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनजवळ शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तीन प्रवासी ट्रेनमधून पडल्याची घटना घडली. प्रवासी कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकलमधून प्रवास करत होते.,

गर्दीमुळे लोकलमधून तीन प्रवासी पडले
मुंबई - मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनजवळ शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तीन प्रवासी ट्रेनमधून पडल्याची घटना घडली. प्रवासी कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकलमधून प्रवास करत होते., प्रथमदर्शनी गर्दीमुळे अपघात झाल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली. जखमींना सायन रुग्णालयात दाखल केले. तीन प्रवाशांपैकी दोघांची प्रकृती स्थिर आहे, तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
नऊ मिनिटे लोकलसेवा विस्कळीत
अपघातानंतर खबरदारी म्हणून ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) बंद करण्यात आली, ज्यामुळे सुमारे नऊ मिनिटे लोकल सेवा विस्कळीत झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सायन हे एक नॉन-ऑपरेशनल स्टेशन आहे, जिथे स्टेशन मास्टर तैनात नाही आणि स्टेशनची जबाबदारी स्टेशन अधीक्षकांवर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
गोवंडी येथील रहिवासी ३६ वर्षीय अफझल चौधरी, नालासोपारा येथील रहिवासी २१ वर्षीय सचिन विश्वकर्मा आणि कुर्ला येथील रहिवासी २५ वर्षीय जैनिल सय्यद अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. त्यांचे जबाब नोंदवल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.