Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोवंडीत सेप्टिक टॅंक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 18:19 IST

उपचार करण्याआधीच तीन मजुरांचा मृत्यू झाला. 

मुंबई - गोवंडी येथे सेप्टिक टॅंक साफ करत असताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना गोवंडी परिसरातील रहेजा कॉम्पलेक्सजवळ गणेशवाडी येथे घडली. तीन खासगी मजूर साफसफाईचे काम करत असताना सेप्टिक टँकमध्ये अडकले होते. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार करण्याआधीच तीन मजुरांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :मृत्यूमुंबई