Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलुंड स्थानकावर तीन सरकते जिने; वयोवृद्ध प्रवाशांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 13:09 IST

मुलुंड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी तीन सरकते जिने (एस्कलेटर) शनिवारपासून सुरू झाले.

मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी तीन सरकते जिने (एस्कलेटर) शनिवारपासून सुरू झाले. ज्यामध्ये स्थानकांचा पश्चिम दिशेला दोन आणि पूर्वेला एक असे तीन सरकते जिने सुरू झाले आहे. त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एलफिस्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन्ही मार्गावरील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सरकते जिन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. त्यानुसार विविध उपनगरीय रेल्वे स्थानकावर सरकते जिने बसवण्यात आले.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर एकूण १११ सरकते जिने कार्यान्वित झाले आहे. याचा फायदा आजारी, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला व अपंग प्रवाशांना  मोठा फायदा झाला आहे. इतर प्रवाशांकडूनही या जिन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच अनेक स्थानक सरकत्या जिन्याचा प्रतीक्षेत होते. त्यानुसार मुलुंड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी तीन सरकते जिने शनिवारपासून कार्यान्वित झाले. मुंबई विभागात २६ पैकी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत ११ सरकते जिने सुरू झाले आहे.

टॅग्स :रेल्वेमुंबई