तीन महिन्यांसाठी ७५२ वाहन चालकांचे परवाने होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:03 AM2019-11-19T03:03:46+5:302019-11-19T03:03:58+5:30

आरटीओकडून नोटीस; वाहतूक नियमांचे तीनदा उल्लंघन केल्याने कारवाई

Three driver's licenses canceled for three months | तीन महिन्यांसाठी ७५२ वाहन चालकांचे परवाने होणार रद्द

तीन महिन्यांसाठी ७५२ वाहन चालकांचे परवाने होणार रद्द

Next

मुंबई : तीनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहन चालकांना महागात पडणार आहे. वाहतूक विभागाने ७५२ वाहन चालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी रद्द करण्यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार, आरटीओने या वाहन चालकांना नोटीस बजावणे सुरू केले आहे.

तीनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७५२ वाहन चालकांचा परवाना निलंबित करावा, अशी शिफारस मुंबई वाहतूक पोलिसांनी आरटीओला केली आहे. यातील काही वाहन चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावल्यानंतर वाहन चालकांना सुनावणीत खुलासा करावा लागेल. खुलासा करता न आल्यास त्यांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. वडाळ्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुरुषोत्तम निकम यांनी ही माहिीत दिली. दरम्यान, वडाळा आरटीओने ११९ पैकी ५३ जणांना नोटीस पाठविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहन चालक अनेकदा भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, उलट दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे अशाप्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. मुंबईत अशा ११ हजार वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन केले होते. यापैकी ७५२ जणांनी तीनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. यातील ६९० जणांनी सिग्नल तोडला, सहा जणांनी भरधाव वाहन चालविले, तर ५६ जण फोनवर बोलत होते. कारवाईची शिफारस मुंबई वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केली. त्यानुसार, ही कारवाई करण्यात येत आहे.

यांच्याकडून उल्लंघन
मुंबईत ११ हजार वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. पैकी ७५२ जणांनी तीनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

Web Title: Three driver's licenses canceled for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.