Join us  

साडेतीन महिन्यात 75 पोलिसांचा कोरोनामुळे बळी, सर्वाधिक 46 जण मुंबईतील 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 9:16 PM

सर्वाधिक 46 जण मुंबईतील 

ठळक मुद्देसर्वाधिक 46 जण मुंबईतील  राज्यात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत राहिला आहे.

मुंबई -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राज्य पोलीस दलातील 75 अधिकारी व अंमलदार या विषाणूला बळी पडले आहेत. तर दोन हजारावर पोलिसांनी त्यावर यशस्वीपणे मात केली आहे.अद्यापही 1157 कोरोना योद्धे या विषाणूवर उपचार घेत आहेत. कोविड-19 मध्ये मृत्यू पावलेल्यामध्ये सर्वाधिक 46  पोलीस मुंबईतील आहेत.त्यामध्ये एक सहाय्यक निरीक्षक तर दोन उपनिरीक्षकाचा समावेश आहे. अमरावती शहरातील एका महिला कॉन्स्टेबलचाही बळी गेला आहे. 

राज्यात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत राहिला आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरून नागरिकांची सुरक्षेसाठी प्रयत्नशील  आहेत.  त्या  प्रयत्नात  दुर्देवाने अनेक पोलिसांना आणि त्याच्या कुटूंबियांना त्याची लागण झाली.त्यामध्ये  मुंबईतील ४३ पोलीस व ३ अधिकारी अशा एकूण46, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,नाशिक शहर १, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५ व ठाणे ग्रामीण १ व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १,जालना SRPF १ अधिकारी व १ पोलीस , अमरावती शहर १ wpc,उस्मानाबाद १, नवी मुंबई  SRPF १ अधिकारी अशा ७५ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला आहे.  तर दोन हजारावर पोलिसांनी त्यावर यशस्वीपणे मात केली आहे.  सध्या राज्यभरातील विविध ठिकाणी  १३० पोलीस अधिकारी व १०२७ पोलीस कोरोना  बाधित आहेत.  त्यांच्यावर संबंधित ठिकाणच्या रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.

टॅग्स :मुंबईपोलिसकोरोना वायरस बातम्यामृत्यू