Three and a half lakh employees travel daily by local | लोकलमधून दररोज साडेतीन लाख कर्मचाऱ्यांचा प्रवास

लोकलमधून दररोज साडेतीन लाख कर्मचाऱ्यांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्याची मुभा आहे. उपनगरीय रेल्वेतून दररोज साडेतीन लाख अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहेत.
यामध्ये पश्चिम रेल्वेतून सरासरी ३ लाख ३०, तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेतून सरासरी १.५० लाख कर्मचारी प्रवास करत आहेत. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारमधील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि खासगी तसेच सहकारी बँकांमधील कर्मचाºयांना समावेश आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन
रेल्वे स्थानक परिसरात आणि रेल्वेत सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. रेल्वेची प्रवासी क्षमता १२०० आहे, पण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी केवळ ७०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.


कोणाला आहे
प्रवासाची मुभा

च्सध्याच्या घडीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच लोकल प्रवास करण्याची मुभा आहे.
च्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी(खासगी आणि सहकारी बँक कर्मचारीही) यांचा समावेश आहे.

कोणाला प्रवासाची
मुभा नाही
उपनगरीय रेल्वेने सामान्य प्रवासी, लोक यांना प्रवासाची मुभा नाही.
ही सेवा राज्य सरकारने परवानगी दिलेल्या अत्यावश्यक कर्मचाºयांसाठी आहे.
राज्य सरकारने विनंती केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. तसेच नियमित सेवा सुरू करण्याबाबत सरकारच्या सूचना आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

च्रेल्वे प्रवासाची मुभा असलेल्या कर्मचाºयांना ओळखपत्र आवश्यक
च्राज्य सरकारने दिलेले
क्यू आर कोड किंवा ईपास आवश्यक
च्प्रवास करणारी व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या सदृढ असावी
च्प्रवास करणारे कंटेन्मेंट झोनमधून आलेले नसावेत
च्रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंग पाळावे
च्मास्क परिधान करावे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Three and a half lakh employees travel daily by local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.