Join us

मराठा आरक्षण भूमिकेवरून प्रसाद लाड यांना धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 08:43 IST

मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल तर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि तीव्र आंदोलन करावे लागेल, असे मत लाड यांनी मांडले आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल तर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि तीव्र आंदोलन करावे लागेल, असे मत लाड यांनी मांडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणप्रश्नी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात धमक्या येत आहेत. या धमक्यांच्या संदेशांची दखल घेत पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल तर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि तीव्र आंदोलन करावे लागेल, असे मत लाड यांनी मांडले आहे. त्यांच्या मतावर प्रतिक्रिया उमटली असून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर लाड यांना पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाड यांनी मराठा आरक्षणासाठी सतत आग्रही राहणार असल्याचे आणि त्यासाठी काहीही सहन करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :प्रसाद लाडमराठा