आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:41 IST2024-03-04T14:40:53+5:302024-03-04T14:41:11+5:30
तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला पिंपरीतून ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे.

आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी
मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना फोनद्वारे शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध सायन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला पिंपरीतून ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे.
प्रसाद लाड हे सायंकाळच्या सुमारास सायन सर्कल येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्यांच्या वतीने विजय पगारे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता पुणे कनेक्शन समोर आले. त्यामुळे तेथे रवाना झालेल्या पथकाने एकाला ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला आहे. आरोपीने फोन का केला? याची पोलिस चौकशी करत आहेत.