‘ते’ तीन पाकिस्तानी नागरिक मायदेशी; देश सोडण्याची मुदत संपल्यानंतर कारवाईला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:37 IST2025-05-02T11:36:48+5:302025-05-02T11:37:24+5:30
सर्व पाकिस्तानी अल्पकालीन व्हिसावर भारतात

‘ते’ तीन पाकिस्तानी नागरिक मायदेशी; देश सोडण्याची मुदत संपल्यानंतर कारवाईला वेग
मुंबई : पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याची मुदत संपल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. मुंबईत राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिल्यानंतर त्यातील १४ जणांनी सोमवारी देश सोडला. तर, वैद्यकीय कारणामुळे उर्वरित तीन पाकिस्तानी नागरिकांनीही देश सोडल्याची माहिती आहे. हे सर्व पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसावर तसेच पर्यटनासाठी आले होते.
अखेर लिफ्टच्या परवान्यासाठी मुंबईच्या वाऱ्या वाचल्या! १ मेपासून फेरबदलाचे आदेश
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जायला सांगितले. त्यानुसार, सार्क व्हिसा असलेल्यांना २६ एप्रिलपर्यंत, वैद्यकीय व्हिसावरील नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत तर १२ प्रवर्गातील व्हिसाधारकांसाठी गेल्या आठवड्यात रविवारची मुदत होती. त्यात आगमनानंतर व्हिसा, व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, परिषद, गिर्यारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, यात्रेकरू आणि गट यात्रेकरू यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारच्या घोषणेनंतर तत्काळ सर्व पाकिस्तानी नागरिकांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली. त्यानुसार, मुंबईतील १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिल्यानंतर त्यातील १४ जणांनी सोमवारी देश सोडला. तर, तीन जणांनी वैद्यकीय कारणामुळे त्यानंतर देश सोडला. त्यानुसार, सर्व १७ ही पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत.
‘आखात’मार्गे पाकिस्तानात
भारत व पाकिस्तानदरम्यानची थेट हवाई वाहतूक बंद असल्यामुळे हे पाकिस्तानी नागरिक थेट पाकिस्तानला न जाता दुसऱ्या देशांत उतरून दुसऱ्या विमानाने मायदेशी परतले. मुंबईतून गेलेले बहुसंख्य पाकिस्तानी नागरिक आखाती देशातून मायदेशी गेल्याचा अंदाज आहे.
...म्हणून आले भारतात
मायदेशी परतलेले पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसावर तसेच पर्यटनासाठी आलेल्यांपैकी होते.