Join us

यंदा विवाह धूमधडाक्यात! वधू-वरांसह घरची मंडळी लागली जोरदार तयारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 13:49 IST

२०२३ मध्ये मार्च, एप्रिल हा महिना कोरडा गेला. पावसाळ्यात सहसा कोणी लग्न करत नाही. त्यातच हिंदू समाजात पितृपक्षात विवाह केले जात नाहीत.

मुंबई : नवरात्रीची धामधूम संपून दिवाळी तोंडावर आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त एकामागोमाग एक असून, २०२३ सालात विवाहबंधनात अडकण्यासाठी अनेक जोडपी तयार आहेत. या जोडप्यांचे लग्न येत्या काळात धूमधडाक्यात होणार असले तरी वधू-वरांसह घरची मंडळी जोरदार तयारीला लागली आहेत.२०२३ मध्ये मार्च, एप्रिल हा महिना कोरडा गेला. पावसाळ्यात सहसा कोणी लग्न करत नाही. त्यातच हिंदू समाजात पितृपक्षात विवाह केले जात नाहीत. मार्च, एप्रिल या महिन्यात लग्नाचा एकही मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांचे लग्न लांबणीवर पडले होते. आता विवाहासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधता येणार आहे. त्यासाठी कोणते कपडे घालायचे, याचेदेखील नियोजन झाले आहे.२०२३ सालात जानेवारी, फेब्रुवारीनंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते. गर्मी आणि पावसाळ्याचा त्रास होऊ नये, यासाठी बहुतांश जोडप्यांनी या काळात आपले लग्न करण्याचे टाळले. गणेशोत्सवानंतर लगेच पितृपक्ष सुरू झाला. मात्र, पितृपक्षात लग्न केले जात नसल्याने इच्छुक जोडप्यांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याची तारीख लग्नासाठी ठरवली आहे.

डीजे, बेंजोची बुकिंगलग्नाची वरात काढताना गाण्यावर थिरकण्यासाठी तसेच वऱ्हाडी मंडळींना नाचवण्यासाठी डीजे आणि बेंजोची बुकिंग करण्यात येत आहे. काहींनी यापूर्वीच केली आहे.

कपड्यांवर आकर्षक सूटचारचौघांत उठून दिसावे, यासाठी पेशवाई, शरारा, साडी, शालू, ब्लेझर यापैकी नेमका कोणता पोशाख परिधान करायचा, हे विवाह इच्छुक मंडळींचे आधीच ठरले आहे.आपल्या आवडीची शॉपिंग करण्यासाठी या मंडळींनी मुंबईतील मार्केटमध्ये धाव घेतली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने कपड्यांवर आकर्षक सूट मिळत आहे.

लॉन्स, हॉटेलवर सनई चौघडेअनेकांचे विवाह हे पारंपरिक पद्धतीने हॉल किंवा मोकळ्या मैदानावर होतात. मात्र, आपलं लग्न हटके पद्धतीने व्हावे, यासाठी लॉन्स, हॉटेलवर विवाह करण्याचा बेत काही मंडळींनी आखला आहे. त्याचेही नियोजित बुकिंग झाले असून लॉन्स, हॉटेलवर सनई चौघडे वाजणार आहेत.

टॅग्स :लग्न