असा असेल इंडियाच्या बैठकीचा कार्यक्रम, सर्व नेते सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:46 IST2023-08-31T06:45:53+5:302023-08-31T06:46:26+5:30

सायंकाळी ६:३० वाजता  ‘इंडिया’च्या लोगोचे अनावरण केले जाईल.

This will be the program of India meeting, all leaders will participate | असा असेल इंडियाच्या बैठकीचा कार्यक्रम, सर्व नेते सहभागी होणार

असा असेल इंडियाच्या बैठकीचा कार्यक्रम, सर्व नेते सहभागी होणार

मुंबई : ‘इंडिया’च्या दोन दिवस चालणाऱ्या बैठकीत ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता बैठकीसाठी उपस्थित शिष्टमंडळ आणि पाहुण्यांचे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते स्वागत करतील. सायंकाळी ६:३० वाजता  ‘इंडिया’च्या लोगोचे अनावरण केले जाईल.

बंगळुरू येथे झालेल्या  दुसऱ्या बैठकीत या आघाडीला ‘इंडिया’ हे नाव देण्यात आले होते. तर मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीत याच्या लोगोचे अनावरण केले जाणार आहे. रात्री ८ वाजता उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनात बैठकीसाठी आलेले सगळे नेते सहभागी होतील.  

‘इंडिया’ बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १०:१५ वाजता बैठकीत सहभागी झालेल्या सर्व नेत्यांचे समूह छायाचित्र काढले जाणार आहे. त्यानंतर १०:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुख्य परिषदेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ३:३० वाजता संयुक्त पत्रकार परिषद होऊन  ‘इंडिया’च्या दोन दिवसांच्या बैठकीची सांगता होणार आहे.

Web Title: This will be the program of India meeting, all leaders will participate