जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 06:34 IST2025-08-17T06:32:12+5:302025-08-17T06:34:10+5:30

कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान या दोन्ही पथकांचे यशासाठी सर्वदूर कौतुक होत आहे

This is what determination should be like! World record of dahi handi levels in Mumbai, Thane; Govinda victory | जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय

जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जिद्द असावी तर अशी यावर्षी पहिल्यांदा दहीहंडी महोत्सवात दोन पथकांनी दहा थराच्या दहीहंड्या लावत विश्वविक्रम केले. ठाणे आणि मुंबईत दोन पथकांनी पाठोपाठ हे विक्रम केल्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या गोविंदा पथकांनी आपले नाव जगभर नेले, या यशासाठी त्यांचे सर्वदूर कौतुक होत होते.

प्रो-गोविंदा स्पर्धेमुळे जय जवान पथक आणि शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात वाद झाला होता, नियोजित वेळेत नोंदणी न केल्याचा ठपका ठेवत आम्हाला प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाद करण्यात आल्याची खंत या पथकाने व्यक्त केली होती. आज दहीहंडीच्या दिवशी कोकणनगर गोविंदा पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात दहा वरांची हंडी फोडत विश्वविक्रमाची नोंद केली.

आमचा विक्रम कोणीच मोडू शकत नाही, असे काही पथकांना वाटत असल्याचा टोलाही सकाळी सरनाईक यांनी लगावला. मात्र, त्याच वेळी घाटकोपर येथे मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी कार्यक्रमात याच 'जय जतान' पथकाने दहा थर लावत दुसरा विश्वविक्रम केला. त्यामुळे शिंदेसेना आणि मनसे दोघांमधील दहीहंडीचा सामना बरोबरीत सुटल्याची राजकीय चर्चा सुरू झाली.

विक्रम मोडण्यासाठीच असतात, असे सरनाईक म्हणाले आणि....

वरळी येथील ठाकरे बंधूच्या विजयी मेळाव्यात नऊ वर लावून विजयी सलामी दिल्याने राजकारण करून आयोजकांनी आमच्या पथकाला प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाद केल्याचा आरोप 'जय जवान'ने केला होता. त्यावर कोकणनगरने ठाण्यात दहा थर रचून विश्वविक्रम करताच सरनाईक यांनी, कोणी काही म्हणू द्या, कोणाचीही युती होऊ द्या. काही गोविंदा पथकांना आमद्या विश्वविक्रम मोडता येणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत, असे वाटते. विश्वविक्रम कोणा एकाची मक्तेदारी नसून ते मोडण्यासाठीच असतात. नऊ थरांचा विक्रम संकल्प प्रतिष्ठान'च्या दहीहंडीतच 'जय जवान'ने केला होता. दहा थर स्वताना ते जिथे कोसळले तिथेच कोकणनगरने विश्वविक्रम केला, असा टोला लगावला, सरनाईक यांचे हे भाषण सर्वत्र पसरण्याआधीच सरनाईक यांच्या टीकेला 'जय जवानाने काही वेळातच घाटकोपर येथे दहा वर स्थून खणखणीत उत्तर दिले.

अन् रोखले गेले श्वास...

दोन्ही ठिकाणच्या हजारी प्रेक्षकांनी हा थरार अनुभवला. 'गोविंदा'च्या गजरात एक.. दोन... तीन म्हणत प्रत्येक थर उंचावत गेला. नववा थर चढताना प्रेक्षकांचा स्वास रोखला गेला आणि दहावा थर पूर्ण होताच जल्लोषाच्या आरोळ्या दुमदुमल्या. गोविंदा पथकांचे खरे राजे आम्हीच, असा दमदार मंदेश या थरारक कामगिरीतून दोन्ही पथकांनी दिला.

ठाणे

  • पथकाचे नाव : कोकण नगर गोविंदा पथक, जोगेश्वरी
  • येथे झाला विक्रम : ठाणे, वर्तक नगर
  • आयोजक : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संस्कृती युवा प्रतिष्ठान


घाटकोपर

  • पथकाचे नाव : जय जवान गोविंदा पथक, जोगेश्वरी
  • विक्रमाचा ट्रिपल धमाका : अमृत नगर, घाटकोपर /वर्तक नगर, ठाणे/भगवती मैदान, ठाणे
  • आयोजक : मनसेचे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार

Web Title: This is what determination should be like! World record of dahi handi levels in Mumbai, Thane; Govinda victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.