पहाटे पाचपर्यंत थर्टी फर्स्टची पार्टी! हॉटेल्समध्ये जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:04 AM2023-12-28T10:04:48+5:302023-12-28T10:06:00+5:30

तरुणाईला आकर्षित करण्यासाठी पदार्थांमध्ये नावीन्य, लाइव्ह म्युझिक, डीजे.

Thirty first party until five in the morning victory preparations in hotels | पहाटे पाचपर्यंत थर्टी फर्स्टची पार्टी! हॉटेल्समध्ये जय्यत तयारी

पहाटे पाचपर्यंत थर्टी फर्स्टची पार्टी! हॉटेल्समध्ये जय्यत तयारी

प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी ठाण्यातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी लाइव्ह म्युझीक, कराओके, डीजे, डान्स फ्लोअर याचे आकर्षण आहे. शहरातील काही हॉटेल्स पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ग्राहकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत असे हॉटेल व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

ठाणे शहरात छोटी-मोठी  ५०० च्या जवळपास हॉटेल्स आहेत. ही हॉटेल्स आदल्या दिवशीपासून सजविली जाणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारांच्या विद्युत रोषणाईसह पांढरे, लाल रंगांचे फुगे लावले जाणार आहे. 

या वर्षी आमच्याकडे डीजे नाइट असेल. त्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या म्युझिकचे सादरीकरण असेल. हॉटेलमधील स्टार्टरमध्ये बदल केले जाणार आहेत, तसेच माॅक्टेल्सच्या प्रकारांत वाढ करणार आहोत. लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ आयोजित केले जाणार आहेत. पाणीपुरीचा स्टॉल लावणार असून डान्स फ्लोअरही असेल. - रवी हुले, हॉटेल संचालक

फुग्यांनी आणि लायटिंगने हॉटेल सजविणार आहोत. कराओके आणि लाइव्ह म्युझिक आमच्याकडे असेल. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचे आम्ही स्वागत करणार आहोत. थर्टी फर्स्ट असला, तरी आम्ही पदार्थांचे दर वाढविणार नाहीत. - नीलेश आर्टे, हॉटेल मालक

आम्ही १ जानेवारीच्या पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवणार आहोत. बुफे सर्व्हिसबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हीटीज आमच्या हॉटेलमध्ये असतील. - रघू शेट्टी, हॉटेल मालक 


मुख्यमंत्र्यांकडे हॉटेल असोसिएशनची मागणी

मंगळवारी हॉटेल असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ठाणे शहरात सुरू असलेले अनधिकृत ढाब्यांना बंद करा अथवा त्यांना परवाने लागू करण्याची मागणी केली.

या ढाब्यांमुळे अधिकृत हॉटेल व्यवसायांवर परिणाम होत आहे, असे हॉटेल असोसिएशनने या भेटीत सांगितले. अन्यथा थर्टी फर्स्टच्या दिवशी हॉटेल बंद ठेवली जातील, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी तुमच्या मागणीचा विचार करून अनधिकृत ढाब्यांविरोधात कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे थर्टी फर्स्टला हॉटेल सुरू ठेवणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी यांनी सांगितले. 

ठाणे शहरात सध्या १०० हून अधिक अनधिकृत ढाबे सुरू आहेत, यावर कारवाई करून सर्व ढाबे बंद करण्यात यावेत, अशी मागणी हाेत असल्याचेही शेट्टी 
यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Thirty first party until five in the morning victory preparations in hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.