विद्यापीठाच्या अर्जावर ‘तिसरा’ पर्याय

By Admin | Updated: April 26, 2015 02:27 IST2015-04-26T02:27:08+5:302015-04-26T02:27:08+5:30

मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना त्यांची ओळख मिळवून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

'Third' option on university application | विद्यापीठाच्या अर्जावर ‘तिसरा’ पर्याय

विद्यापीठाच्या अर्जावर ‘तिसरा’ पर्याय

मुंबई : मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना त्यांची ओळख मिळवून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाच्या प्रवेश अर्जावर नवीन शैक्षणिक वर्षापासून तृतीयपंथीयांना आपले जेंडर नोंदविण्यासाठी तिसरा कॉलम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांनीही आपल्या प्रवेश अर्जावर तिसरा कॉलम उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक टीका-टिप्पणीला सामोरे जावे लागते. यावर मात करीत काही विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येतात. मात्र तिथेही त्यांना दुजाभाव सहन करावा लागतो. प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश मुंबई विद्यापीठामार्फत करण्यात येतात.
या प्रवेश अर्जावर तृतीयपंथीयांसाठी तिसरा कॉलम उपलब्ध करून
देण्याचा निर्णय विद्यापीठाने
घेतला आहे. तसेच महाविद्यालयांनी इतर वर्षाच्या प्रवेशासाठी
प्रवेश अर्जावर तृतीयपंथीयांसाठी वेगळा कॉलम उपलब्ध करून देण्याच्या सूचना विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कक्षाने दिल्या आहेत.
इतर विद्यार्थ्यांकडून तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, तसेच तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी वेगळी रेस्ट रूम उपलब्ध करून देण्याची सूचना कक्षाने महाविद्यालयांना केली आहे.
(प्रतिनिधी)

वेगळी रेस्ट रूमही मिळणार
तृयीयपंथी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जावर आपल्या जेंडरची
नोंद करण्याची सोय विद्यापीठाने उपलब्ध करून दिली
आहे. याबाबतच्या सूचना महाविद्यालयांनाही देण्यात आल्याचे विद्यार्थी कल्याण कक्षाचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांसाठी वेगळी रेस्ट रूमही उपलब्ध करून देण्याची सूचना कक्षाने महाविद्यालयांना केली आहे.

Web Title: 'Third' option on university application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.