Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेवरील तिसरी एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 04:34 IST

लोकलची चाचणी मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते कसारा या दरम्यान घेण्यात येईल

मुंबई : मेक इन इंडिया अंतर्गत मेधा बनावटीची एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. या लोकलची चाचणी मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते कसारा या दरम्यान घेण्यात येईल. त्यानंतर ती पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल.मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मार्च २०२० पर्यंत प्रत्येकी ६-६ एसी लोकल दाखल होणार आहेत. यापैकी दोन एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर दाखल झाल्या आहेत, तर तिसरी एसी लोकल मेक इन इंडिया अंतर्गत मेधा बनावटीची आहे. दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरून एसी लोकलच्या चाचणीचे निरीक्षण करण्यासाठी आरडीएसओचे अधिकारी मुंबईत दाखल झालेले आहेत. कल्याण ते कसारा दरम्यान एसी लोकलच्या चाचण्या यशस्वी झाल्यास भविष्यात त्या मध्य रेल्वे मार्गावरून चालविण्यात येतील. मध्य रेल्वे मार्गावर सप्टेंबर महिन्यात एसी लोकल दाखल होईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.

टॅग्स :एसी लोकलपश्चिम रेल्वे