Join us

पवई आयआयटीत चोरट्यांनी 12 वाहनांच्या काचा फोडल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 16:20 IST

पवई आयआयटीत हाफ मॅरेथॉन दरम्यान चोरट्यांनी 12 वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.

मुंबई - पवई आयआयटीत हाफ मॅरेथॉन दरम्यान चोरट्यांनी 12 वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. तसेच या गाड्यांमधून चोरट्यांनी मोबाईल, बॅग, लॅपटॉपसारख्या अनेक मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. 

पवई आयआयटीमध्ये आज सकाळी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक धावपटू मुंबईत आले होते. त्याचदरम्यान  चोरट्यांनी संधी साधत मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या आणि महागड्या वस्तूंची चोरी केल्याची माहिती मिळत आहे. पवई पोलीस ठाण्यात 12 गाड्या फोडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :मुंबईचोर