हायवेच्या कामात पैसा, टोलमध्येही घोटाळा; अंजली दमानिया यांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:51 IST2025-09-25T12:48:17+5:302025-09-25T12:51:14+5:30
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हायवेच्या कामात पैसा, टोलमध्येही घोटाळा; अंजली दमानिया यांचे आरोप
केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. टोलच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नितीन गडकरी यांनी जनतेवर टोल थोपवला. नागरिक आधीच रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे सर्व कर भरत असताना टोल का लादला जात आहे?, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. तसेच टोलमधून मिळालेला पैसा गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांना हस्तांतरित केल्याचा दावा करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर इथेनॉलवरुनही टीका केली. तसेच ज्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया' म्हटले जाते, इथेनॉल संदर्भात गडकरींच्या कंपन्यांवर टीका केली. इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या आहेत. मोठ्या घोटाळ्याचा संशय असून त्यांच्याकडे अशा १२८ कंपन्यांचे तपशील असल्याचा दावा दमानिया यांनी केला.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी गडकरी यांचे नाव घेतलेले नाही. पण दोन्ही मुलांच्या कंपन्या असा उल्लेख केला. हायवेवरील टोलच्या माध्यमातून मिळालेला पैसा आयडीएल कंपन्यांमार्फत थेट गडकरींच्या मुलांसाठी बनवलेल्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केली.