Join us

५ मिनिटांत घर साफ करायच्या या महिला; अल्पवयीन मुलांच्या मदतीने डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 12:29 IST

अल्पवयीन मुलांच्या मदतीने डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पवयीन मुलांच्या मदतीने घरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या गुजरातमधील महिला टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन महिलांसह त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रेखा सतीश राठोड (३५),  निली दीपू पवार (३०) आणि मनीषा दीपू पवार (२०) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहे.

दादर परिसरात राहणाऱ्या संजीव विनोद चंद्र पारेख (६२) यांच्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:४७ ते ११:५२ च्या दरम्यान ही घटना घडली. २ तारखेला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलांच्या त्रिकुटाने अवघ्या पाच मिनिटांत कार्यालयात घुसून मोबाइल आणि पैसे चोरून पळ काढला. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांत चोरी केलेले ६ मोबाइल आणि दोन हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

गस्तीवरील पोलिसांना अलर्ट आला अन्...  माटुंगा पोलिस ठाणे परिसरात गेली दोन दिवसांपासून घरामध्ये घुसून काही महिला आणि मुली चोरी करत असल्याचे व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांना अलर्ट देण्यात आला.  त्यानुसार, संशयास्पद फिरणाऱ्या  तीन महिला व तीन मुलीस ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.  त्यांच्या चौकशीत त्या चोरीच्या उद्देशाने मुंबईत आल्याचे स्पष्ट झाले. अटक त्रिकुटाने आरएके पोलिस ठाणे, नेहरूनगर पोलिस ठाणे परिसरात देखील चोरी केल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई