गडचिरोलीत नक्षलवाद्यांची निशाणी राहणार नाही; फडणवीसांचा इशारा; कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी केले सी-६० सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 06:51 IST2026-02-20T06:49:53+5:302026-02-20T06:51:43+5:30
याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही कारवाई केवळ काही बांधकामे पाडण्यापुरती मर्यादित नसून नक्षलवादी दहशत आणि हिंसाचाराला मुळापासून चिरडण्याचा ठाम संदेश आहे.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची निशाणी राहणार नाही; फडणवीसांचा इशारा; कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी केले सी-६० सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचे कौतुक
मुंबई : गडचिरोलीच्या भूमीवर सी-६०, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ४४ नक्षल स्मारके उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. जवानांच्या या कामगिरीचे कौतुक करत हा गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाच्या मुळांवर निर्णायक प्रहार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही कारवाई केवळ काही बांधकामे पाडण्यापुरती मर्यादित नसून नक्षलवादी दहशत आणि हिंसाचाराला मुळापासून चिरडण्याचा ठाम संदेश आहे. गडचिरोलीच्या भूमीवर नक्षलवाद्यांची कोणतीही निशाणी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
“आग्रा किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक बांधणार अन् PM मोदी तिथे शिवजयंती साजरी करतील”: CM फडणवीस
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच शांतता व विकासाच्या मार्गावर ठामपणे पुढे जाण्यासाठी सुरक्षा यंत्रणा पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.
आता केवळ सात जिल्हे नक्षलग्रस्त; त्यात महाराष्ट्रातील एकही जिल्हा नाही
देशामध्ये नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या आता फक्त सात उरली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही जिल्हा नाही. झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या नऊ राज्यांचा आढावा केंद्र सरकारने नुकताच घेतला. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला. मार्च २०२६पर्यंत देशातील नक्षलवाद्यांचा संपूर्ण नायनाट करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने बाळगले आहे.
हे आहेत सात नक्षलग्रस्त जिल्हे
छत्तीसगड: बिजापूर, नारायणपूर, सुकमा, कांकेर, दंतेवाडा I झारखंड: पश्चिम सिंहभूम I ओडिशा: कंधमाल
नक्षलग्रस्त जिल्ह्यांचे तीन उपप्रकार
सर्वात प्रभावित जिल्हे (नक्षलवाद्यांचा अजूनही मोठा उपद्रव असले
बीजापूर, नारायणपूर आणि सुकमा
संकटग्रस्त जिल्हे (जिथे नक्षलवाद कमी होत आहे, पण संसाधन आवश्यक )
कांकेर, पश्चिम सिंहभूम
अन्य नक्षलग्रस्त प्रभावित जिल्हे
दंतेवाडा, कंधमाल
शस्त्रे टाका.. जिवंत राहिलो तरच अन्यायाविरुद्ध लढू !
गडचिरोली : ‘क्रांती म्हणजे फक्त शस्त्राची लढाई नव्हे... अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आधी स्वतः जिवंत राहणे गरजेचे आहे. जर आपणच उरलो नाही, तर कसली क्रांती आणि कसले लक्ष्य? जिवंत राहूनच ध्येय गाठता येतेे’ हा नवा विचार एकेकाळी जंगलात बंदुकीच्या जोरावर क्रांतीचे स्वप्न पाहणारा प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा एकेकाळचा रणनीतीकार व आत्मसमर्पित माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू (६९) याने मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या भूपतीने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी ६० सहकाऱ्यांसह गडचिरोलीत आत्मसमर्पण केले होते. माओवादमुक्तीच्या लढ्यातील ही ऐतिहासिक घडामोड होती.