भाजपमध्ये प्रवेशाचे लवकरच होतील धमाके, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 07:21 IST2023-06-21T07:20:12+5:302023-06-21T07:21:14+5:30

मुंबई : येत्या काही महिन्यांत भाजपमध्ये लहानमोठे अनेक नेते प्रवेश करतील. भाजप प्रवेशाचे बॉम्बब्लास्ट बघायला मिळतील, असा दावा प्रदेशाध्यक्ष ...

There will be explosions of entry into BJP soon, state president Chandrasekhar Bawankule claims | भाजपमध्ये प्रवेशाचे लवकरच होतील धमाके, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

भाजपमध्ये प्रवेशाचे लवकरच होतील धमाके, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

मुंबई : येत्या काही महिन्यांत भाजपमध्ये लहानमोठे अनेक नेते प्रवेश करतील. भाजप प्रवेशाचे बॉम्बब्लास्ट बघायला मिळतील, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कोणीही कमी करू शकत नाही, असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. याबाबत  बावनकुळे म्हणाले, येत्या काही महिन्यांत भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशासाठी रांगा लागल्याचे तुम्हाला दिसेल. उद्धव ठाकरेंच्या पक्षात ४ लोक उरतील. 

लोकप्रियता फडणवीसांचीच
‘न्यूज एरेना इंडिया’ या न्यूज पोर्टलने मुख्यमंत्रीपदासाठी ३५ टक्के मतदारांची पसंती फडणवीसांना असल्याचे सर्वेक्षण केले आहे. याबाबत बावनकुळे म्हणाले, २०१४ सत्ता आली तेव्हाही फडणवीस लोकप्रिय होते. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व व फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा यातूनच युतीला १६५ जागा मिळाल्या होत्या. फडणवीस लोकप्रिय आहेतच, ती कोणीही कमी करू शकत नाही.

Web Title: There will be explosions of entry into BJP soon, state president Chandrasekhar Bawankule claims