ग्रॅण्ट रोड, भायखळ्यात गुरुवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा नाही; जलवाहिनी दुरुस्तीचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 02:29 IST2019-10-06T02:29:00+5:302019-10-06T02:29:09+5:30
रेसकोर्स, हाजी अली येथील १६०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम महापालिका करणार आहे.

ग्रॅण्ट रोड, भायखळ्यात गुरुवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा नाही; जलवाहिनी दुरुस्तीचे काम
मुंबई : तलावांमध्ये मुबलक जलसाठा असला तरी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीनिमित्त डी आणि ई विभागाच्या हद्दीतील नागरिकांना दोन दिवस पाणीकपातीचा फटका बसणार आहे. येत्या गुरुवार आणि शुक्रवारी ग्रॅण्ट रोड आणि भायखळा या परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
रेसकोर्स, हाजी अली येथील १६०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम महापालिका करणार आहे. हे काम गुरुवार, १० आॅक्टोबर रोजी सकाळी ०९.३० वाजता सुरू होणार असून ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या काळात पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
या ठिकाणी पाणीपुरवठा बंद
डी विभाग - १० आॅक्टोबर रोजी रात्री ७:३० ते ९ वाजेपर्यंत-तुकाराम जावजी मार्ग, ताडदेव मार्ग, साने गुरुजी मार्ग, तुळशीवाडी, आंबेडकर नगर, मुंबई सेंट्रल व महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, स्लेटर रोड, ताडदेवचा आसपास भाग, गमदिया कॉलनी.
ई विभाग - १० आॅक्टोबर सकाळी ९.३० ते ११ आॅक्टोबर पहाटे चार वाजेपर्यंत नायर रुग्णालय व कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे पाणीपुरवठा होणार नाही.