मुंबईत २०२० मध्ये एकही मॉल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:37 AM2020-11-18T05:37:39+5:302020-11-18T05:40:02+5:30

काेराेनामुळे कामांना ब्रेक : देशातील ५५ पैकी ५ मॉलचे काम पूर्ण

There is no new mall in Mumbai in 2020 | मुंबईत २०२० मध्ये एकही मॉल नाही

मुंबईत २०२० मध्ये एकही मॉल नाही

Next

मुंबई : कोरोना दाखल होण्यापूर्वी २०२० साली देशभरात २ कोटी 
२२ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ५५ मॉल सुरू होतील, असा अंदाज होता. मात्र, कोरोना संक्रमणामुळे या मॉल उभारणीचा डोलारा 
कोसळला.            
 जेमतेम २७ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले पाच मॉल या वर्षभरात सुरू करणे शक्य झाले. दिल्ली, गुरुग्राम, बंगळुरू आणि लखनऊ या शहरांतले हे माॅल असून त्यात सर्वाधिक मॉल्सचे शहर अशी ख्याती अललेल्या मुंबईतील एकाही मॉलचा समावेश नाही.
गेल्या दशकभरात मॉल संस्कृती भारतात रुजली असून महानगरांपाठोपाठ छोट्या शहरांतही मॉलचे जाळे विस्तारत आहे. त्यामुळेच २०२० साली देशात विक्रमी संख्येने मॉलची उभारणी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 
देशातील ५५ पैकी १ कोटी ४६ लाख चौरस फुटांचे ३५ मॉल हे देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये उभारले जात आहेत. तर, उर्वरित २० माॅलचे बांधकाम हे द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये सुरू आहे. ही कामे २०२० मध्ये पूर्ण होतील आणि मॉलचे कामकाज याच वर्षी सुरू होईल, असा 
अंदाज होता. परंतु, हे अंदाज कोरोनामुळे चुकल्याची माहिती ॲनराॅक प्राॅपर्टीज या सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून मिळाली.

कोरोनाचा प्रचंड मोठा फटका 
रिटेल क्षेत्राला बसला. त्यामुळे माॅलमधील जागा भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले. परिणामी माॅल उभारणीच्या कामांना ब्रेक लागल्याची माहिती ॲनराॅकचे सीईओ अनुज केजरीवाल यांनी दिली.

येत्या वर्षी ६ नवे मॉल
बांधकाम सुरू असलेले किंवा रखडपट्टी झालेले १४ मॉल २०२१ पर्यंत पूर्ण होतील. त्यांचे एकूण क्षेत्रफळ ५९ लाख चौरस फूट असेल. त्यापैकी सर्वाधिक १६ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ६ मॉल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उभे राहतील. त्याखालोखाल तीन मॉल बंगळुरूत उभारले जात असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

Web Title: There is no new mall in Mumbai in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.