मुंबई : राज्यात सोमवारपासून काेराेना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देणे सुरू झाले. मात्र, लाभार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मुंबईत १६ जानेवारीला पहिली लस देण्यात आली. दुसऱ्या डोसच्या पहिला दिवशी ४ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट होते. पैकी १,९२६ लाभार्थ्यांना लस दिली. त्यांना २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा होता. १,९२६ पैकी फक्त ७१ जणांनी ताे घेतला. तर दुसऱ्या दिवशी २१२ जणांनी दुसरा डोस घेतला. कोविन ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस मिळविण्यात अडचण येत आहे.आतापर्यंत मुंबईत लसीचा दुसरा डोस तीन टक्के लाभार्थ्यांनीच घेतला. राज्याच्या आरोग्य विभागाचे डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, दुसरा डोस घेण्यासाठी जनजागृती, प्रोत्साहन, तांत्रिक अडचणी दूर करण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ७ लाख ७७ हजार जणांचे लसीकरण झाले.
दुसरा डोस घेण्यासाठी लाभार्थ्यांमध्ये उत्साह नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 01:37 IST