Join us
Daily Top 2Weekly Top 5

सध्या एक 'मुन्नाभाई' फिरतोय, स्वत:ला बाळासाहेब समजतोय; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 21:16 IST

सध्या एक जण भगवी शाल घालून फिरतोय; मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई: आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता फडणवीस म्हणतात आम्हाला गधाधारी म्हणतात. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सणसणीत टोला लगावला. यावेळी त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर नाव न घेता हल्ला चढवला.

काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं. तसं सध्या एकाला वाटू लागलंय. हल्ली एक मुन्नाभाई फिरतोय, असा टोला ठाकरेंनी लगावला.

सध्या एकजण भगवी शाल पांघरून फिरतोय. आपणच बाळासाहेब असं त्याला वाटू लागलंय. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तसंच यांचंही झालंय. त्यामुळे यांना फिरू द्या. कधी ते मराठीचा मुद्दा घेऊन फिरतील. कधी हिंदूंचा मुद्दा घेऊन येतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला.

टॅग्स :उद्धव ठाकरेराज ठाकरे