आरोपी पाकिस्तानला गेल्याचे पुरेसे पुरावे नाहीत, १२ आराेपींची सुटका करताना न्यायालयाचे निरीक्षण

By दीप्ती देशमुख | Updated: July 23, 2025 10:58 IST2025-07-23T10:58:35+5:302025-07-23T10:58:48+5:30

कमल अन्सारी, तन्वीर अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, शेख मोहम्मद अली आलम शेख, सुहेल शेख  आणि जमीर शेख हे सर्व आरोपी पाकिस्तानला गेले आणि तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.

There is not enough evidence that the accused went to Pakistan, the court observed while releasing 12 accused. | आरोपी पाकिस्तानला गेल्याचे पुरेसे पुरावे नाहीत, १२ आराेपींची सुटका करताना न्यायालयाचे निरीक्षण

आरोपी पाकिस्तानला गेल्याचे पुरेसे पुरावे नाहीत, १२ आराेपींची सुटका करताना न्यायालयाचे निरीक्षण

दीप्ती देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क 


मुंबई : काही आरोपी पाकिस्तानला गेले आणि ते सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी पासपोर्ट सादर केले असले तरी बॉम्बस्फोट त्याच आरोपींनी केले आहेत. मात्र, या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी आरोपी पाकिस्तानला गेल्याचे पुरावे पुरेसे नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने १२ आरोपींची निर्दोष सुटका करताना नोंदविले.

कमल अन्सारी, तन्वीर अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, शेख मोहम्मद अली आलम शेख, सुहेल शेख  आणि जमीर शेख हे सर्व आरोपी पाकिस्तानला गेले आणि तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. आरोपी पाकिस्तानला गेल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी त्यांचे पासपोर्टही न्यायालयात पुरावे म्हणून सादर केले. आरोपी पाकिस्तानला गेल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी पासपोर्ट व अन्य कागदपत्रे सादर केली.  मात्र, बॉम्बस्फोट स्वत: आरोपींनी घडवून आणले, हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे पुरेसे नाहीत. सर्व बाजूंनी गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरल्याने आरोपी केवळ प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात गेले होते, हे पटणारे नाही, असे न्या. अनिल किलोर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने म्हटले.

सीडीआर सादर न केल्याने सरकारी वकिलांचे नुकसान
मोबाईल नंबर आरोपीच्या नावावर नव्हते तरीही आरोपी वापरत असलेल्या मोबाईल नंबरची माहिती सरकारी वकिलांना होती. असे मोबाईल नंबर रेकॉर्डचा भाग असतात. तरीही सरकारने त्या मोबाईल नंबर्सचा सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) सादर केला नाही. बचाव पक्षाने सीडीआर सादर केल्यानंतर सरकारी वकिलांनी आपली भूमिका बदलली आणि कट रचण्यासाठी आरोपी सतत एकमेकांच्या संपर्कात होते, असे सांगितले. 

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार,  हे सर्वजण सिमीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यापैकी बहुतेकजण एकमेकांना ओळखतात. त्यामुळे लँडलाईन नंबरचा वापर करून ते एकमेकांच्या संपर्कात होते. 
मात्र, बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे पुरेसे नाहीत. सरकारी वकिलांनी सीडीआर सादर न करता उलट तो नष्ट केला, त्यावरून सरकारी वकिलांच्या विरोधात निष्कर्ष निघतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

Web Title: There is not enough evidence that the accused went to Pakistan, the court observed while releasing 12 accused.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.