मरिन ड्राइव्हला मिळणार आता आणखी झळाळी; हेरिटेज वारसा जपून होणार सुशोभीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:29 AM2023-11-16T11:29:07+5:302023-11-16T11:29:26+5:30

आगामी काळात खास करून दक्षिण मुंबईचे रुपडे बदलण्याची शक्यता आहे.

There is a possibility that the face of South Mumbai will change in the future. | मरिन ड्राइव्हला मिळणार आता आणखी झळाळी; हेरिटेज वारसा जपून होणार सुशोभीकरण

मरिन ड्राइव्हला मिळणार आता आणखी झळाळी; हेरिटेज वारसा जपून होणार सुशोभीकरण

मुंबई : आगामी काळात खास करून दक्षिण मुंबईचे रुपडे बदलण्याची शक्यता आहे. नवीन  पर्यटन स्थळे, विविध प्रकल्प, सुशोभीकरण, जुन्या बेस्ट बसचा  पर्यटनासाठी वापर, तलावांचे सुशोभीकरण... अशी योजनांची जंत्री मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली आहे. त्यातील काही योजना प्रत्यक्षात आकारास आणण्याकरिता प्रशासनाने काम सुरू केले आहे. अगदी मुंबईकरांचा आवडता मरिन ड्राइव्ह आणि हुतात्मा चौक (पूर्वीचे  फ्लोरा फाउंटन) ते एशियाटिक लायब्ररीपर्यंतच्या भागाचा विकास केला जाणार आहे. या दोन्ही स्थळांचा कायापालट करताना त्यांचा हेरिटेज दर्जा जपला जाणार आहे हे विशेष!

मरिन ड्राइव्ह अर्थात क्वीन्स नेकलेस 

- हे स्थळ म्हणजे तमाम मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत आहे. असंख्य मुंबईकर दररोज या ठिकाणी येत असतात. 
- इथला सूर्यास्त पाहण्यासाठी तोबा गर्दी असते. त्यामुळे अनेकदा इथल्या कठड्यावर बसायलाही  जागा नसते. 
-या मरिन ड्राइव्हचे सुशोभीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराचे देखणेपण आणखी झळाळून 
उठेल. या स्थळाला हेरिटेज दर्जा आहे. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.  या परिसराचा विकास करताना हेरिटेज दर्जाला धोका न लावता काम करावे लागेल. महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे.

फ्लोरा फाउंटन 

विविध प्रकारची झाडे-झुडपे आणि कारंजे यामुळे या भागाला फ्लोरा फाउंटन म्हणून ओळखले जाई. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी त्याचे नामकरण हुतात्मा चौक स्मारक असे  करण्यात आले. हा परिसर हुतात्म्यांची सदैव आठवण करून देणारा आहे. विकास करताना हुतात्मा चौकाच्या मागील बाजूच्या एशियाटिक लायब्ररीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाईल.

Web Title: There is a possibility that the face of South Mumbai will change in the future.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई