राज्यात काेराेनाचे ७१ हजार ९१० सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:25 IST2020-12-11T04:25:10+5:302020-12-11T04:25:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ५ हजार ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ...

There are 71,910 active patients of Kareena in the state | राज्यात काेराेनाचे ७१ हजार ९१० सक्रिय रुग्ण

राज्यात काेराेनाचे ७१ हजार ९१० सक्रिय रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ५ हजार ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १७ लाख ४७ हजार १९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५२ टक्के झाले आहे. सध्या राज्यात ७१ हजार ९१० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात गुरुवारी काेराेनाचे ३ हजार ८२४ रुग्ण आढळले असून, ७० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ६८ हजार १७२ झाली असून मृतांची संख्या ४७ हजार ९७२ इतकी आहे. मृत्युदर २.५७ टक्के आहे. राज्यात ५ लाख ४१ हजार ५९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर ५ हजार १३७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

............................

Web Title: There are 71,910 active patients of Kareena in the state