Join us

"...तर माहीम समुद्रात गणपती मंदिर", राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली महिनाभराची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 06:56 IST

आजपर्यंत एवढेच माहीत होते की, शिवाजी महाराज सुरतहून लूट करून महाराष्ट्रात आले होते. पण, महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच - राज ठाकरे

मुंबई : माहीमच्या  बाबाच्या दर्ग्यासमाेर भर समुद्रात भराव घालून मजार बांधण्यात आली आहे. गेल्या दाेन वर्षांत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे हे बांधकाम करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांना त्यासाठी आम्ही महिनाभराची मुदत देताे, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर घेतलेल्या जाहीर सभेत दिला.यावेळी त्यांनी अनेक गाैप्यस्फाेट केले.

मला शिवसेनेत प्रमुखपद किंवा कोणतेही पद हवे होते म्हणून बाहेर पडलो नाही. बाहेर पडण्याआधी मी उद्धव ठाकरे यांना विचारले होते की काय हवे ते घ्या; पण, मला माझे काम सांगा. मला बाजूला ठेवले. नाहीतर बाळासाहेबांसमोर मी पक्ष कसा काढला असता, असा सवाल करताना नारायण राणेंनाही शिवसेना सोडायची नव्हती; पण, पक्षातली माणसे बाहेर कशी जातील हेच यांना हवे होते.  

जूनमध्ये सगळा तमाशा झाला. अलीबाबा आणि त्यांचे चाळीस जण सुरतला गेले. त्यांना चोर म्हणता येणार नाही. कारण ते चोर नाहीत. यांनाच (उद्धव ठाकरे) कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली. आजपर्यंत एवढेच माहीत होते की, शिवाजी महाराज सुरतहून लूट करून महाराष्ट्रात आले होते. पण, महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच.     - राज ठाकरे

टॅग्स :राज ठाकरेमनसे